मी अनुभवलेली आणिबाणी: 45 वर्षे

ICT Media    17-Jul-2020
Total Views |


emergency_1  H
 

मी अनुभवलेली आणिबाणी: 45 वर्षे
 
25 जुन 1975 रोजी तत्कालीन प्रधानमत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या सुचनेवरुन देशभरात राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी आणिबाणीची घोषणा केली. त्याला आता 45 वर्षे पूर्ण झाली. याला कारण होते ते म्हणजे, अलाहाबाद हायकोर्टाने श्रीमती इंदिरा गांधी यांची रायबरेली लोकसभा मतदार संघातील निवडणूक रद्दबातल ठरवली होती. सन 1975 रोजी लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी रामलीला मैदानावरुन संपूर्ण क्रांतीची घोषणा केली होती - ’सिंहासन खाली करो, अब जनता जागी है ।‘
 
26 जुन 1975 रोजी आकाशवाणी वरुन भाषण करतांना “Broadcast to the Nation”- श्रीमती इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, The President has proclaimed Emergency. This is nothing to panic about …. राष्ट्रपतीजीने देश मे आपातकाल की घोषणा की है । इससे आतंकित होने का कोई कारण नही ।
 
संदर्भ: 27 मे 1975 रोजी , मी आकाशवाणी नागपूर केंद्रात असि. एडीटर (Scripts) म्हणून रुजू झालो होतो आणि सुमारे एक महिन्यातच आणिबाणी घोषित झाली होती. तत्पूर्वी मी आकाशावाणीच्या वृत्त विभागात कार्यरत होतो.
 
सध्या मिडीयात आज घडीला उत्तम Content Writer ची गरज आहे. Event and Public Relations या क्षेत्रात तर ही आवश्यक आणि महत्वाची गरज बनली आहे. त्यावेळी दुरदर्शन बाल्यावस्थेतच होतं. ते सर्वदूर पोहचलं नव्हतं. जनतेशी संवाद साधण्याचं Radio आकाशवाणी हेच एकमेव साधन. रेडीओचं जाळं सर्वदूर पसरलेलं - विदेशात सुद्धा आणिबाणीत रेडीओचा उपयोग मोठ्या प्रमाणावर झाला.
 
आकाशावाणी वरील आणिबाणीची घोषणा झाली आणि सर्व देशभर वातावरण सामसुम ! आता काय होणार? अशी चिंता पसरली. सर्व आकाशावाणी केंद्रांना सूचना ‘देशाच्या अखंडतेला आणि राष्ट्रीय हिताला बाधा आणणा-या संघटनांवर बंदी आणि विरोधी राजकीय नेत्यांची धरपकड करुन त्यांना तुरुंगावासात डांबणे हा कार्यक्रम आणि मुख्य म्हणजे माध्यमांवर बंदी म्हणजे Censorship म्हणजे Freedom of speech, Freedom of writing यावर घाला , बंदी घालण्यात आली. सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी आणि लोकांशी संवाद साधण्याचं आकाशवाणी हे एकमेव माध्यम आणि तेही सरकारी.
 
याप्रसंगी आणिबाणीच्या 21 महिन्यांच्या काळात आम्हा लिहीणा-या आणि बोलणा-या कलावतांना फार तारेवरची कसरत करावी लागत असे. आम्ही लिहीलेली संहिता (Script) तीन-चार अधिकारी तपासून घेत. वाचण्याची Rehersal (तालीम) करुन घ्यावी लागे कारण कार्यक्रम प्रसारित - म्हणजे (Live broadcast – (No Recording) पध्द्तीनं होत असे. सरकार आणि सरकारी धोरणा विरुध्द् चुकुनही शब्द नको !
 
त्यानंतर 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा झाली. सर्व कार्यक्रम या कार्यक्रमाचे गुणगान करणारे प्रसारीत व्हायचे, सरकार पुरस्कृत कार्यक्रम.
 
एक उदाहरण म्हणजे - या काळात आचार्य विनोबा भावे यांनी मौनव्रत स्विकारलेलं ! वर्धा जिल्हयातील सेवाग्राम जवळील परंधाम आश्रमात स्मशान शांतता. सरकारी संत म्हणून आचार्यांची त्याकाळी संभावना झाली होती... काही दिवसानंतर म्हणजे 3 डिसेंबर 1976 रोजी आचार्यांनी मौनव्रत सोडण्याची घोषणा केली. त्यावेळी आचार्य विनोबा काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं ! माध्यमांना तर बातमी हवी होती. त्याकरिता परंधाम आश्रमात भल्या पहाटेपासून पत्रकार , दृक-श्राव्य माध्यमे यांची एकच गर्दी. मी सुद्धा आकाशवाणीच्या चमूत - Recording साठी. आचार्य विनोबा काय बोलतात ते Record करुन प्रसारित करण्याची जबाबदारी. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचलेली . डिसेंबरच्या भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत आचार्य तोकड्या कपड्यानीशी बाहेर. आलेले सभोवती आश्रमातील भगिनी आणि आचार्य उदगार्लेत...
 
आणिबाणी म्हणजे अनुशासन पर्व -
आम्ही एक-एक शब्द मायक्रोफोनने टिपत होतो. बस ! एवढं वाक्य बोलून आचार्य विनोबा भावे मौनात.
बिच्चारे पत्रकार! एवढयावर त्यांचं कसं भागणार ? त्यांना सणसणीत प्रतिक्रीया अपेक्षीत होती. आम्ही मात्र खुश - विनोबा बोलले - ते आम्ही ध्वनिअंकित करुन त्यांचं वारंवार प्रसारण आकाशवाणी वरुन केलं.
- त्याच दिवशी - विविध कार्यक्रमातून. वर्तमानपत्रांनी दुस-या दिवशी बॅनर लाईन लावली.
“आणिबाणी म्हणजे अनुशासन पर्व!! आचार्य विनोबा. असा त्याकाळचा जनसंपर्क !
आणिबाणीला काल 45 वर्षे पूर्ण झालीत.
 
त्या निमित्ताने हे संस्मरण !!
 
कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी, नागपूर (नि.)
डाॅ. बबन नाखले (नि.)
जनसंवाद विभाग प्रमुख
धनवटे नॅशनल काॅलेज, नागपूर